घरचा कर्ताधर्ता गेल्याने कुटुंबावर पसरली शोककळा. पत्नी आई मुलींनी कसे जगावे? हा प्रश्न निर्माण झाला ! पोंभुर्णा ( प्रतिनिधी)- एकीकडे कोरोना व्हायरसच्या संक्रमण भितीने देशात संचारबंदी लागली असून माणसाला घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे, मात्र ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच जगणं मुश्किल झालं आहे, अशातच घराचे बांधकाम अर्ध्यावर आहे ते गरीब बिचारे पैसा नसल्यामुळे कुठून तरी पैसे जमवण्याचे प्रयत्न करीत आहे.अशाच एका ४० वर्षीय मूल तालुक्यतील येरगाव येथील भोजराज पत्रुजी मडावी घराचे बांधकाम सुरू होते मात्र पैशाची जुळवाजुळव करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तो आपल्या बहिणीकडे गेला मात्र वैनगंगा नदी पार करत असताना त्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून दिनांक ९ रोज गुरुवार ला सकाळी उघडकीस आली. मूल तालुक्यातील येरगाव येथील भोजराज पत्रुजी मडावी वय
Tag: आकस्मिक म्रुत्यु
धक्कादायक :-धारीवाल कंपनीमधील जनक राणे नावाच्या कामगाराचे प्रेतच केले गायब? आकस्मिक अपघाताची नोंद,
दुर्दैवी घटना :- कंपनी व्यवस्थापन करताहेत कामगाराच्या नातेवाईकांना मोबदला देण्यास टाळाटाळ, कंपनी गेट जवळ मनसे शिवसेना या राजकीय संघटना सोबतच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली कंपनीकडून मोबदला देण्याची मागणी. चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर तालुक्यातील टाडाळी येथील धारीवाल या विज निर्मिती कंपनी मधे रात्र पाळीत असलेल्या जनक राणे या कामगारांचा म्रुत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली होती, धारीवाल कंपनीच्या गोडाऊन चे काम सुरू असतांना रात्र पाळीत काम करतांना रात्रीला त्याची ड्युटी एमआयडीसी मधील कॉंक्रीट प्लांट मधे असतांना रात्रीला त्याचा अपघात होऊन म्रुत्यु झाल्याचे बोलल्या जात असले तरी कंपनी व्यवस्थापण हे सत्य मानायला तयार नाही.परंतु पोलिसांच्या मदतीने जनक राणे याच्या बॉडीला जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी पोस्टमार्टेम करण्यासाठी नेल्यावर त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. विशेष म्हणजे ठेकेदाराचा रात्रीला जवळपास १ ते १.३० वाजता म्रुतक जनक राणेंच्या मोबाईलवर फोन