बोबडे परिवाराचे लाखोंचे नुकसान! प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी:- कोरपना येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धोपटाळा या गावी आज अकरा वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे जनावराचा चाऱ्याला आग लागल्यामुळे गोठ्यामध्ये असलेले दोन म्हशीचे वघार, आणि चार वासरे, बकरीचे तीन नग,दोन मोटार सायकल व शाळेत मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणारी सायकल व कापूस विक्रीसाठी आवरात ठेवलेल्या 3 बंडी मध्ये भरलेला कापूस अंदाजे 25 क्विंटल कापुस जळून भस्म झाला. धोपटाळा येथील मनोहर बोबडे, मुरलीधर बोबडे, दशरथ बोबडे, दिवाकर बोबडे, विजय बोबडे या बोबडे परिवाराची सर्व मालमत्ता जळून भस्म झाली असून जनावरे व बकऱ्यांची सुद्धा जीव हानी झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात बोबडे परिवाराचे लाखोंचे नुकसान झाले असून या वेळी गावकऱ्यांनी महिला पुरुष एकत्र येऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे विझवण्याचा प्रयत्न करण्यात लवकर यश