कडक बंदोबस्तात केवळ औषधी दुकाने सुरू परंतु किराणा दुकानासह सर्व दुकाने राहणार बंद . चंद्रपूर दि.१६ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सोमवारपासून १७ ऑगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर येथे लॉक डाऊन प्रशासनाने घोषित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस ग्रामपंचायतमध्ये रविवार दिनांक 16 ऑगस्ट पासून रात्री आठ वाजल्यापासून 20 ऑगस्ट रात्री 12 वाजे पर्यंत सर्व किराणा दुकान सर्व किरकोळ व ठोक विक्रेते सर व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने आस्थापना संपूर्णता बंद राहतील असे स्पष्ट केले . बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार 17 ऑगस्ट पहाटेपासून 21 तारखेपर्यंत बल्लारपुर बामणी बंद राहणार आहे. गोंडपिंपरी शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. 16 ऑगस्टपासून 22 तारखेपर्यंत लॉक डाऊन पाडण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात 21 व 22 तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा देण्यासाठी नऊ ते दुपारी
Tag: आरोग्य
चंद्रपूरकरांना सुखद बातमी :- चंद्रपूरातील त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांतील पाचही सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह !
त्या पॉझिटिव्ह रुग्णाची पुन्हा टेस्ट रिपोर्ट होण्याची शक्यता ! चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर शहरात नुकत्याच १३ मे ला एका २३ वर्षीय मुलीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती आणि चंद्रपूर शहरात पुन्हा लॉक डाऊन सक्त करण्यात आले होते त्यामुळे चंद्रपूर शहरातील जनता गोंधळलेली होती की त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या किती लोकांना कोरोना ची लागण झाली असेल ? परंतु जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल बिनबा परिसरातील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सर्व 5 सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहीती जाहीर झाल्याने चंद्रपूर शहरातील जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे. अगोदरच हाताला काम नाही आणि छोटे मोठे दुकाने बंद यामुळे जनता आर्थिक द्रुष्टीने त्रस्त झाली असतांना आता नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने सगळीकडे चिंतेचा सूर होता. मात्र आता पुन्हा चंद्रपूर शहर पूर्वपदावर येईल
दखलपात्र :- दिलीप पल्लेवार यांनी केली कॅन्सर पडित पोचन्ना ऊर्फ सुनिल कलगुलवार परिवाराला 5000 रूपयाची आर्थिक मदत्त !
लॉक डाऊन च्या काळात दिलीप पल्लेवार च्या रूपात देवदूत आल्याची पिडीत कुटुंबीयांची प्रतिक्रिया ! चंद्रपूर प्रतिनिधी :- एकीकडे कोरोनाच्या वैश्विक महामारी संकटात सर्व जनता घरी बसली असतांना जनतेच्या सेवेत अविरत कार्यरत असलेले काँग्रेस कमेटी चंद्रपूर जिल्हा पर्यावरण विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी गोरगरीब कुटुंबीयांना अन्नधान्य व भाजीपाला पुरवठा करून त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सोडवला आणि आता पर्यावरण विभागातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून कॅन्सर पीड़ित यांना पाच हजार रूपयाची आर्थिक मदत्त केली आणि कुठलीही गरज पडली तर आम्ही कलगुलवार कॅन्सर च्या बीमारिने झुंझ देत असलेल्या परिवाराच्या पाठीशी आहे असा ठाम निर्धार चंद्रपूर पर्यावरण विभाग जिल्हा अध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी व्यक्त केला. तसेच बहुजन सैनिक चैनल चे चंद्रपूर जिल्हा . प्रतिनिधि .विनोद दुर्गे यांनी जास्तीत जास्त मदत्त एक हाताने जे जमेल ते पैशाच्या
आश्चर्यच :- एक वर्षाच्या चिमूकलिचा कोरोना संदेश ! म्हणाली कोरोना आहे आईस्क्रीम नाही खायचं !
आईच्या प्रश्नांना एका वर्षाची चिमुकली देते थेट उत्तर ? चंद्रपूर प्रतिनिधी :- कोरोनाच्या संकटानी अनेक स्थित्यंतरे आली असून ज्यांना वेळ मिळत नव्हता घरी थांबायचा ते आता कोरोना च्या भीतीने घरात बंद आहे, आणि ज्यांना बोलायची वेळ नव्हती ते तासनतास बोलत आहे, पण याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे जी लहान मुलं कधी कोणत्या बीमारी संदर्भात बोलत नव्हती ती आता सद्यस्थितीत चालू असलेल्या कोरोनामुळे बोलायला लागली आहे, अशीच एक चंद्रपूर मधील मुलगी जी फक्त एक वर्षाची आहे ती चक्क आपल्या आईला म्हणते की बाहेर जाणार नाही कोरोना आहे, बाहेर पोलिस आहे ते दंडे मारतात हातावर जाऊ नाही आणि बेटा तू आईस्क्रीम खाणार का असे विचारल्यावर ती म्हणते नाही खाणार कोरोना आहे. अर्थात एका चिमुकली चा हा संदेश अनेकांना प्रेरणा देणारा असाच आहे.
दखलपात्र :-अल्ट्राटेक मुख्य प्रवेशद्वारा जवळ रेड झोन ऑरेंज झोन जिल्ह्यातील वाहनांची गर्दी?
बाहेर जिल्हातुन येणाऱ्या या वाहणामुळे स्थानिक नागरिकांमधे भीतीचे वातावरण ? प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सीमेंट उद्योग नुकताच सुरू झाला आहे. लॉकडाऊण नंतर उद्योग सुरू होताच जड़ चार चाकी,सहा ते सोळा चाकी वाहनांची गर्दी वाढली असून ही वाहने रेड झोन व ऑरेंज झोन जिल्ह्यातून येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ मोठया ट्रकची पार्किंग नांदा- फाटा, गडचादूर रोडवर करण्यात येत आहे .आज सकाळ्पासून जवळपास 70 ते 80 ट्रक रोड वर उभ्या करण्यात आल्या यात वाहन चालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत असून ट्रक चालकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. ट्रकांची लांबच लाबं रागा लागल्याने जीवनावश्यक वस्तुंसाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनानी आपल्या परिसरात वाहने उभी करण्याची गरज आहे. परंतु तसे
सणसणीखेज :-डॉ. नगराळे विरोधातील त्या कारवाईत काय तथ्य ? त्यांच्या म्रुत रुग्णांचा कोरोना रिपोर्ट सरकारी प्रयोगशाळेत निगेटिव्ह !
खाजगी प्रयोगशाळेतील रिपोर्ट खरी कशी ? डॉ. नगराळें व रुग्णांच्या पाच सदस्यांचे नमुने ठरवतील आरोग्य प्रशासनाचे भविष्य, अफवांचा बाजार तेज ? मात्र म्रुत रुग्णांच्या परिवारातील सदस्यांना व परिसरातील नागरिकांमधे भीतीचे वातावरण! चंद्रपूर प्रतिनिधी :- सध्या चंद्रपूर मधे कुठलाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसून डॉ. नगराळे यांच्या रुग्णालयातील तो रुग्ण नागपूरच्या मेयो या शासकीय रुग्णालयात मरण पावला होता त्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले असून नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयाने मुंबई येथे खाजगी प्रयोगशाळेत रुग्णांचे स्वैब नमुने पाठवले ते पॉझिटिव्ह असल्याचे बोलल्या जात आहे.नव्हे तशा प्रकारची रिपोर्ट ही प्रसारमाध्यमांकडे पोहचली असल्याची पण चर्चा आहे. मात्र या संदर्भात नागपूरच्या खाजगी डॉक्टरांनी कुठलीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही असे बोलल्या जात आहे. चंद्रपूर रहमतनगर मधील संशयित म्रुतक रुग्णांच्या परीसरात पोलिसांची मॉकड्रील झाली होती, मात्र ती मॉकड्रील नसून
खळबळजनक :-39 वर्षीय चंद्रपूरचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न !
नागपूर येथे आमदार निवासात विलगिकरण कक्षात ठेवन्यात आले होते. चंद्रपूर प्रतिनिधी :- 39 वर्षीय चंद्रपूर येथील असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे. हा रुग्ण इंडोनेशिया येथे काही लोकांसोबत गेला होता,त्यानंतर तो 22 मार्चला नागपूर येथे पोहोचला, या अगोदर इंडोनेशिया ते दिल्ली आणि दिल्ली ते नागपूर असा त्यांचा प्रवास होता. त्यामुळे त्यांना त्यादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्यांच्या तपासणीनंतर दिसून येते. नागपूर येथे त्याची चौकशी व त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यावर त्याला MLA हॉस्टेल येथे विलगिकरण करण्यात आलेले होते, व त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तपासणीचा अहवाल आल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे नागपुरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 झाली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती चंद्रपूर येथील असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आता प्रशासनात चांगलीच खळबळ उडालेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुणाल
आनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, कुटुंबात गेल्याचा मजुरांना आनंद !
संचारबंदीचे बळी कामगार ठरू नये ! प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- ब्रह्मपुरी चामोर्शी सावली या भागातील शेतमजूर मिरची तोडाई गहू व हरभरा कामासाठी नांदेड जिल्हा किनवट तालुक्यातील कामाला गेले होते, मात्र संचारबंदी लॉक डाऊन झाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली होती, शेतकरी आपल्या गावाला जा असे म्हणून झालेल्या कामाची मजुरी देऊन त्यांना स्वगावी जायचा सल्ला दिला. पण बस सेवा, रेल्वे बंद झाल्याने दोन दिवस त्याच ठिकाणी राहून त्या पंचवीस मजुरानी पायदळ निघन्याचा निर्णय घेऊन मिळेल त्या वाटेने कोरपना या ठिकाणी 30 तारखेला पोहोचले. एका पत्रकाराने जन सत्याग्रह संघटनेच्या अध्यक्षांना माहिती दिली 25 मजूर आवश्यक गरजेचे साहित्य घेऊन चालत होते .130 की.मीटर पायदळी आल्यामुळे त्यांचे शरीर थकले होते. आबिद अली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड मॅडम, ठाणेदार गुरनुले साहेब,यांना माहिती देऊन नगरपंचायतीची मुख्य कार्यकारी
मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी घेतला कोरोना COVID-19 सर्वेचा आढावा !
चंद्रपूर शहरात कुठेही पॉझिटिव्ह रुग्ण नाही मात्र सतर्कता पाळण्याचा वैद्यकीय सल्ला ! चंद्रपुर प्रतिनिधी :- शहर महानगरपालिका "अंतर्गत शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र क्र 1" इंदिरा नगर केंद्रास मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी प्रत्यक्ष भेट देत आरोग्य केंद्रातिल डॉक्टर,नर्स व कर्मचर्यांची बैठक घेऊण M.E.L प्रभागात तसेच आरोग्य केंद्रा अंतर्गत भागात सुरू असलेल्या COVID 19 सर्वे चा आढावा घेतला.बैठकीत सर्वे दरम्यान सुरू असलेले कार्य,एकूण कर्मचारी,सर्वे करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या,पुणे मुम्बई नागपुर औरंगाबाद येथून आलेल्या विद्यार्थी,नौकरदार वर्ग आदींची महीती घेण्यात आली तसेच विदेश यात्रेतून परतलेल्या ची आकडेवारी घेण्यात आली तसेच सर्वे दरम्यान कर्मचार्यंच्या अडचणी आदी सर्व बाबी जाणुन घेण्यात आल्या. COVID 19 सर्वे मधे आरोग्य केंद्र प्रमूख डॉक्टर जयश्री मालुसरे ,GNM नर्स प्रियंका नवाते,ANM नर्स- 3,आशा वर्कर-9,मनपा शिक्षक-4 व अंगणवाडी सेविका-2 आदीच्या माध्यमातून सर्वे सुरू आहे. नर्सेस,कर्मचारी
आनंदाची बातमी :- लॉकडाऊनच्या काळात ८ कोटी कुटुंबीयांना मिळणार विविध लाभ, मोदींचे “कोरोना पैकेज” जाहीर !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा, ८ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, व शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार? कोरोना अपडेट :- लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पुढील तीन महिने गरिबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या घोषणा ! 1. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज 2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच 3. देशात कोणही उपाशी राहणार नाही 4. शहर-ग्रामीण भागातील