कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला संपविण्यासाठी शासन प्रशासन व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली? सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी केली कारवाईची मागणी ! जिल्हा प्रतिनिधी :- चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक पॉवर प्लांट, विविध कारखाने, पेपरमिल, स्पाँज आयर्न प्लांट, कोळसा खाणी व त्यावर आधारित इतर छोटे मोठे उद्योग आहे, ह्या सर्व उद्योगात लाखो कामगार सेवा देण्याचे काम करीत असून सध्या कोरोना या महाआजाराने संपूर्ण जगामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. व आतापर्यंत ह्यावर कुठल्या प्रकारचे उपचार होण्याकरिता औषधीच तयार झालेली नाही म्हणून देशातील संपूर्ण राज्यात व इतर जिल्ह्यातील लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे, संपूर्ण शासकीय व अशासकीय कार्यालयात फक्त 5.टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याचे शासन प्रशासनाने संपूर्ण देश स्थळावर आदेश दिले असून अनेक राज्याच्या प्रमुख विभागाने आपल्या विभागाला अशा प्रकारचे निर्देश देऊन