कोट्यावधीच्या रेती चोरीत तहसीलदार यांचा सहभाग ? नायब तहसीलदार यांनी रेती ट्रँक्टर पकडून सुद्धा सोडले असल्याची चर्चा. चंद्रपूर प्रतिनिधी :- तालुक्यात सद्ध्या रेती माफियांनी नद्यांच्या रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी चालवलेली असून या रेती चोरीमधे तालुक्यातील तहसील प्रशासन सुद्धा गुंतले असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे. राष्ट्रीय खनिज संपत्तीचे सरक्षण करण्याचे काम ज्या खनिकर्म विभाग आणि तहसील प्रशासनाकडे आहे त्या विभागाचे अधिकारीच जर खनिज संपत्ती चोरीमधे अडकले असेल तर खनिज संपत्तीची चोरी ही होणारच, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस नदी घाटातील वाळू चोरी खूप मोट्या प्रमाणात होत असल्याची तक्रार चंद्रपूर तहसीलदार यांना मिळाल्यावर चंद्रपूर तहसीलदार यांची एक टीम गठित करून वाळू तस्करी नंदीच्या काही अंतरावर साठवून ठेवलेली शेकडो ब्रास वाळू जप्त करते व जप्त केलेल्या वाळूची लिलावी प्रक्रिया 12 फरवरी व 13 फरवरी ला