जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने यात्रा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ, चंद्रपूर प्रतिनिधी :- मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. मात्र यंदा गुडीपाडव्यापासून सुरु होणारी हि चैत्रातील महाकाली यात्रा जिल्हाधिकारी यांनी कोरोना व्हायरसच्या संभावित धोक्यामुळे रद्द केली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस च्या आक्रमणांमुळे मोठी महामारी होत आहे, आणि या कोरोनाने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी लोक जमून चुकून कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महाकाली मंदिर ट्रस्ट सोबत मिळून हा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत असे आदेश राज्यसरकारने दिले होते . अश्यातच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यातील सर्वात मोठी होणारी महाकाली यात्रा रद्द करण्याचा निर्णय
Tag: धार्मिक
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दुल्हेशाह बाबा दर्गा येथे उर्स महोत्सव !
तीन दिवस चालणार उर्स महोत्सव कार्यक्रम ! कोरपना प्रतिनिधी :- तालुक्यातील प्रसि'द्ध दर्गा जनतेचे श्रद्धास्थान कुसळ येथील दुल्हेशाह बाबा यांचा उर्स कार्यक्रम होळीच्या तीन दिवस अगोदर पासुन दरवर्षी होत असते, या उर्स ला तालुक्यातील व तालुक्या बाहेरील जनता हजेरी लावुन आपले नवस पुर्ण करण्यासाठी दर्ग्यावर नतमस्तक होतात. तिन दिवस चालणाऱ्या या उर्सला मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते व विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते, सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी हजेरी लावत असतात या वर्षी दिनांक ६ मार्चला सुरु होणारा उर्स आठ तारखेला संपणार आहे.कौमी एकता समारोह या कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर चे आमदार तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार असुन उदघाटक खासदार बाळुभाऊ धानोरकर हे राहणार आहे तर विषेश अतिथी म्हणून सुभाष भाऊ छोटेआमदार, किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे
वरोरा येथे गुरुनानक जयंती उत्सव संपन्न !
विविध कार्यक्रमाचे आयोजन ! वरोरा प्रतिनिधी :- शहरात आणि तालुक्यात प्रथमच गुरुनानक जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दिनांक १२ आक्टोम्बार रोज मंगळवारला शहरातील व तालुक्यातील अनाथ, अंध अपंग, आणि ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले तर शहरात जूलूस काढण्यात आला. गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करून रेल्वे स्टेशन रोड चौक येथे समाजाच्या वतीने लंगर लावण्यात आले आणि सर्वांना भोजन देन्यात आले. या गुरुनानक जयंती उत्सव समितीमधे प्रेमकुमार केशवाणी. लखन केशवाणी.प्रशांत, जंग बहादुरसिंह बावरा.जीतसिंह', फतेहसिंह.अमन शिवानी. दिपक, कुंदन, हरीश, लेखू, सूरज, कन्हय्या, आणि सर्व केशवाणी निक्कि छाबडा, गुरुमीतसिंह, भोलाशिह.मीना, राजनी, महेक, सुलोचना, नेहा, पूजा, सोनी, खुशी, मनदीप कौर, सविता कौर.राम कौर.रणजित कौर, पूजा कौर. अजित कौर इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला.