नागपूर, ता. ३१ : नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून गुरुवारी (ता. ३१) २० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनिमित्त मनपाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशी रोप आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. मनपाचे सहायक निगम अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक (पेंशन) नितीन साकोरे यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये लोककर्म विभागाचे उपअभियंता के.बी. खत्री, उपअभियंता सी. आर. गभने, सहायक शिक्षिका अश्विनी बतकी, सहायक शिक्षक सुरेंद्र जाधव, सहायक शिक्षक शारदा गुजर, सहायक शिक्षिक राजेंद्र दुरुगकर, ज्येष्ठ श्रेणी लिपिक पी. डब्ल्यू तळोकर, राजस्व निरीक्षक डी. एल. धुमाळ, मोहरीर सुनील कनोजिया, कर संग्राहक ए. व्ही. वैद्य, हवालदार एन. जे. पांडे, मलवाहक जमादार वाय. एन. मेश्राम, मनोहर कांबळे, चपराशी सुमन मांडवगडे, अरुण पोहरकर, गोपाल बारापात्रे, मजदूर भाऊराव गेडाम, रेजा मनदा कवठे, सफाई कामगार बुधिया सिरकिया, मजदूर रामलखन
Tag: नगरपालिका
इंडस्ट्रीयल इस्टेड प्रभाग क्र ६ नगरसेवकांचे वॉर्डातील समस्यांकडे सर्रास दुर्लक्ष
वॉर्डातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राहुल लांजेवार यांचा पुढाकार इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्र ६ इथे पाणी टंचाई व प्रभागातील नगरसेवक प्रदीप डे,सुधीर कारगल,धनराज सावरकर व आत्ताच नव्याने निवळून आलेल्या नगरसेविका कलावती यादव यांच्या उदासीन व बेजवाबदार पणा मूळे या प्रभागाचा विकास रखळलेला आहे , यांच्या कामचोर पणा व निवळणुका आल्या की फक्त मतांच राजकारण करणे, नंतर जनतेला,जनतेच्या समस्या सोडविण्या करीता टाळाटाळ करणे किंवा सत्ताधाऱ्याकडे समस्या घेऊन जाण्याचा सल्ला देऊन स्वतः मोकळे होत असल्याचा अनुभव वॉर्डातील अनेक नागरिकांना येतोय. प्रभागातील पाणी टंचाई बघता आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रभागाच्या विकासाचा ध्यास बाळगुन असणारे सर्वोप्तरी मदतनिस स्थायी समिती अध्यक्ष राहुलभाऊ पावडे यांच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल प्रभाग क्र ६ येथली श्रमिक नगर ,व रयतवारी परिसरात नागरिकांच्या मागणी नुसार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राहुल लांजेवार
जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतींचा संचालकांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि.15 जून: नगरविकास संदर्भात राज्याचे नगरपालिका प्रशासन विभागाचे संचालक मुथुकृष्णन शंकरनारायणन यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील नगरपालिकांच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. नगर विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ते शनिवारी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर आले होते. दुपारी वरोरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी वरोरा येथील नगर परिषदेचा आढावा घेतला. या ठिकाणी त्यांनी सुरु असलेल्या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन क्षेत्र पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत जिल्हयातील नगर पंचायती व नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांशी चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने संचालकांनी नगरोत्थान योजनेचा प्रस्ताव सादर करताना नगरपालिकांनी घ्यावयाची काळजी, प्रस्तावामध्ये विविध बाबींचा समावेश, 19 डिसेंबर 2018 च्या शासन पत्रानुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, रस्त्यांची कामे करताना अधिकाऱ्यांनी पाळायचे निकष, नगरपालिकांना राज्य शासनामार्फत प्राप्त झालेल्या एकूण निधी, त्याअंतर्गत विविध मान्यता प्राप्त कामे, पूर्ण झालेली कामे, चालू असलेली कामे, प्रलंबित असलेली कामे यावर मुख्याधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. सोबतच अधिकाऱ्यांना कामासंदर्भात येत असलेल्या अडचणी जाणून