नागपूर, ता. ३१ : नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून गुरुवारी (ता. ३१) २० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनिमित्त मनपाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशी रोप आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. मनपाचे सहायक निगम अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक (पेंशन) नितीन साकोरे यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये लोककर्म विभागाचे उपअभियंता के.बी. खत्री, उपअभियंता सी. आर. गभने, सहायक शिक्षिका अश्विनी बतकी, सहायक शिक्षक सुरेंद्र जाधव, सहायक शिक्षक शारदा गुजर, सहायक शिक्षिक राजेंद्र दुरुगकर, ज्येष्ठ श्रेणी लिपिक पी. डब्ल्यू तळोकर, राजस्व निरीक्षक डी. एल. धुमाळ, मोहरीर सुनील कनोजिया, कर संग्राहक ए. व्ही. वैद्य, हवालदार एन. जे. पांडे, मलवाहक जमादार वाय. एन. मेश्राम, मनोहर कांबळे, चपराशी सुमन मांडवगडे, अरुण पोहरकर, गोपाल बारापात्रे, मजदूर भाऊराव गेडाम, रेजा मनदा कवठे, सफाई कामगार बुधिया सिरकिया, मजदूर रामलखन
Tag: नागपूर
मेट्रो पिलरवरील कलाकृती ठरतंय आकर्षणाचे केंद्र
नागपूर १६: वर्धा महा मार्गावरील छत्रपती चौकात मेट्रोच्या पिलरवर उभारण्यात आलेली कलाकृती या चौकातून चहुबाजूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आकर्षित करीत आहे. अल्प कालावधीत मेट्रोने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आलेख या कलाकृतीच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे. उभ्या भिंतीवर किंवा पिलरवर अश्या प्रकारची कलाकृती उभारण्याचा प्रयोग पहिल्यांदाच शहरात राबविण्यात आला असून याला नागरिकांतर्फे ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोच्या पिलरवरील या कलाकृतीकडे पाहतांना यात एकूण १८ मनुष्य दोरीच्या साहाय्याने वरती चढतांना दिसत आहेत. हे चित्र दर्शविण्यासाठी मेट्रोच्या या पिलरवर लोखण्डी साहित्यांचा वापर करून दोरीसारखे दिसणारे जाळ तयार करण्यात आले. गेल्या अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नातून शहरातील ४० प्रसिद्ध कलाकारांनी ही कलाकृती तयार केली आहे. पिलरच्या ४९५ चौरस फूट इतकया भागावर ही कलाकृती चारही बाजूने दिसेल अश्याप्रकारे लावण्यात आली आहे. एम एस शीटच्या साहायाने संपूर्ण
गडचिरोलीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली: गडचिरोलीत रविवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ग्यारापत्ती येथील नरकसा जंगलाच्या परिसरात रविवारी पहाटे ही चकमक झाली. या परिसरात सी-६० पथकाचे जवान गस्त घालत असताना त्यांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी जखमीही झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये सी-६० पथकाच्या हाती मोठा शस्त्रसाठाही सापडल्याचे समजते. पोलीस दलाकडून अधिक कारवाई सुरू आहे.
लोकसंख्येचे नियंत्रणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करा !
जगात चीननंतर सर्वाधिक लोकसंख्या भारताची (136 कोटी) असून लोकसंख्या नियंत्रण ही भारताची सर्वांत मोठी समस्या बनली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील नैसर्गिक साधन सुविधा, आर्थिक स्थिती, रोजगार, अन्न-धान्य, शिक्षण, शासकीय सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदींवर प्रचंड ताण येत आहे. त्यात मुसलमानांना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली मुसलमान आणि अन्य पंथीय यांना विशेष सुट देऊन देशात असमान कायदापद्धती व योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदूंमध्ये देशात आपल्याशी भेदभाव व अन्याय होत असल्याची भावना गेली 70 वर्षांपासून वाढतच आहे. ज्या प्रमाणे मोदी सरकारने घटनेचे कलम 370 हटवून एक देश-एक संविधान हे तत्त्व अंमलात आणले. तसेच समता, न्याय, बंधूता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एक देश-एक विधान लागू करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान
भाजप आणि काँग्रेसमधील वाद चांगलाच पेटला
भाजपचा झेंडा लावाल तर घरात घुसून मारू: काँग्रेस आमदार भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले, आमदार सुनील केदार सर्वात मोठे गुंड नागपूर - जिल्ह्यातील सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी सिल्लेवाडा येथे 'भाजप चे झेंडे लावणाऱ्यांना घरात घुसून मारण्याच्या' धमकी नंतर आता भाजपनं त्यांचं आव्हान स्विकारलं आहे. भाजपनं सिल्लेवाडा गावात घरोघरी जाऊन भाजपचे झेंडे लावत केदांरांना प्रतिआव्हान दिलं आहे. आज सकाळीच सिल्लेवाडा गावात शेकडोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोळा झाले होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार आणि आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात घराघरावर भाजपचे झेंडे लावले. बस फेरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या श्रेयवादाच्या लढाईवरून काँग्रेस आमदार सुनील केदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांच्यात हमरीतुमरी झाली होती. त्यानंतर आज भाजपने झेंडे लावण्याचे आंदोलन केलं. जशी-जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तसं राजकीय वातावरण तापत चाललं आहे. आमदार सुनिल केदार
न्यायालयीन प्रकरणातील आवश्यक माहिती प्राथमिकतेने द्या
वी : ॲड. धर्मपाल मेश्राम मनपा पॅनलवरील वकिलांच्या आढावा बैठकीत विधी समिती सभापतींचे निर्देश नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील न्यायालयीन प्रकरणांमध्ये मनपातील संबंधित अधिका-यांच्या असहकार्यामुळे प्रकरणात अडणची निर्माण होतात. विशेषत: उच्च न्यायालयातील प्रकरणांमध्ये अधिका-यांच्या असहकार्याने न्यायालयीन अडथळे येतात. अधिका-यांच्या असहकार्याने येणा-या न्यायालयीन अडथळ्यांची गांभीर्याने दखल घेत अधिका-यांनी आवश्यक माहिती मनपा वकिलांना प्राथमिकतेने पुरविण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीत दिले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.१३) आयोजित मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीत विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह विधी अधिकारी ॲड.व्यंकटेश कपले, ॲड.सुधीर पुराणीक, ॲड.ए.एम.काझी, ॲड.जैमिनी कासट, ॲड. मेहाडीया, ॲड.अमित प्रसाद, ॲड.रोहन छाबरा, ॲड.सचिन अग्रवाल, ॲड.अमित कुकडे, ॲड.डी.एस. देशपांडे, ॲड.सचिन नारळे, ॲड. सुषमा ढोणे, ॲड. अपूर्वा अजंठीवाले, ॲड.कांचन निंबुळकर, ॲड.दंडवते, ॲड.नंदेश देशपांडे, ॲड.एस.जी.हारोडे, सहायक
नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना
- केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग व जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे युवकांना आवाहन *स्टार्ट अप फेस्ट चे उद्घाटन नागपूर - विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे . त्यांनी नवकल्पनांना उद्योगात परावर्तित करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले . नागपूर महानगर पालिका व मेयर इनोवेशन काऊंसीलच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मानकापूर क्रीडा संकूल येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने ‘स्टार्ट अप फेस्ट’ व ‘द ॲसिलरेट’चे आयोजन करण्यात आले होते . ‘स्टार्ट अप फेस्ट’ च्या उद्घाटनाप्रसंगी गडकरी मुख्य
अडचणींवर मात करा, ‘स्टार्ट-अप’ने झेप घ्या!
युट्यूबर रणवीर अलाबादीयाने दिला तरुणाईला मंत्र नागपूर, ता. २४ : आपल्या मनातील संकल्पनांना मूर्त रुप आणण्याचे स्टार्ट-अप हे मोठे माध्यम आहे. मात्र अनेकदा याविषयी पुरेपुर माहिती नसल्याने अपयशाचा सामना करावा लागतो. कोणत्याही गोष्टीच्या यशासाठी कोणतिही अपेक्षा न ठेवता काम करणे व इतरांना देत राहणे ही भावना आवश्यक आहे. कामातील सातत्य आणि त्यामागची मेहनत ही कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक आहे. मात्र या सर्वांमध्ये अनेक अडचणी येतात या अडचणींचा धैर्याने सामना करा, अडचणींवर मात करा आणि आपल्या संकल्पनांना ‘स्टार्ट-अप’ची जोड देउन झेप घ्या, असा मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी मानकापूर स्टेडियममधील उपस्थित तरुणाईला दिला. ‘इनोव्हेशन पर्व’च्या दुस-या दिवशी ‘स्टार्ट-अप’ फेस्टमध्ये सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी शनिवारी (ता.२४) मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये उपस्थित तरुणाईशी संवाद साधला. यावेळी तरुणांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देत
अनुसुचित जाती व जमातींच्या रिक्त जागांसाठी ऑफलाइन प्रवेश सुरु
भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसी) मधील अभ्यासक्रम 26 ऑगस्ट रोजी लेखी परिक्षेचे आयोजन नागपूर/अमरावती 21 ऑगस्ट 2019 नवी दिल्ली येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिन असणा-या भारतीय जनसंचार संस्था( इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन -आयआयएमसी) येथील पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविकेच्या अनुसुचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रीया घेण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या 32जागासांठी आयआयएमसीच्या अमरावती, धेनकनाल. कोट्टायम, जम्मू, ऐजवाल येथील 6 प्रादेशिक केंद्रात ऑफलाइन प्रवेश उपलब्ध आहेत. आयआयएमसी दिल्लीत हिंदी व उर्दू पत्रकारिता पदविकेसाठी 7 जागा, आयआयएमसी धेनकनाल येथे इंग्रजी व ओडिया पत्रकारिता पदविकेसाठी 10 जागा, आयआयएमसी अमरावती येथे इंग्रजी व मराठी पत्रकारिता पदविकेसाठी 4 जागा,आयआयएमसी कोट्टायममध्ये इंग्रजी व मल्याळम पत्रकारिता पदविकेसाठी 6 तर आयआयएमसी ऐजवाल साठी 2 आणि आयआयएमसी जम्मूच्या इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या 3 जागा उपलब्ध आहेत. प्रवर्गनिहाय तपशीलाची माहिती http://www.iimc.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे. सामान्य प्रवर्ग, इतर
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोचे आणखी एक पाऊल
महा मेट्रो आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड दरम्यान सामंजस्य करार नागपूर ०८ :* ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित महा मेट्रो नागपूर प्रकल्पात मेट्रो स्टेशनवर सोलर पॅनल लावण्यात आले आहे. नागपूर मेट्रो स्टेशन वर आता पर्यत ९६५ सोलर पॅनल लावण्यात आले आहे तसेच ६५% उर्जा ही सौर उर्जा प्रकल्पातून घेण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. आज पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोने आणखी एक पाऊल घेत उर्जा दक्षता सेवा लिमिटेड(Energy Efficiency Service Limited) या भारत सरकार,उर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला. महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्यूरमेट विभाग) श्री. आनंद कुमार आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख श्री. किशोर चव्हाण यांनी या सामंजस्य करारवर संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर,संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तांक्षर केले. महा मेट्रोचे