पत्रकारितेत पैशासाठी लाचार बोगस पत्रकारांची फौज तयार झाल्याने भीमराव पडोळे सारख्या भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन ? भद्रावती प्रतिनिधी :- सद्ध्या भद्रावती पोलिस स्टेशन मधील कुख्यात पोलिस कर्मचारी भीमराव पडोळे हे बोगस पत्रकारांसाठी देवदूत बनले असल्याची चर्चा आहे. आता हे खरंच देवदूत आहे की जनतेकडून लूट करणारा भ्रष्ट कर्मचारी आहे हे भद्रावती शहरातील जनता आता ठरविणार आहे. या संदर्भात भद्रावती शहरातील जनतेच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून एका वाचकांनी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल मधे "आश्चर्यच :- तब्बल चार वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटक होताना वाचलेला पोलिस हवालदार भीमराव असा कसा ?" या आशयाच्या बातमी वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की "हा माणुस पक्का लाचखाऊ असुन त्याच्या कडे येणाऱ्या लोकाना नेहमीच 4...5 वेळा चकरा मारायला लावुन कामे करतो. मी स्वता हा अनुभव अनेकदा
Tag: पोलिस प्रशासन
खळबळजनक :- ठाणेदार पवार पेक्षा पोलिस हवालदार भीमराव पडोळेचे कार्य मोठे ? एका न्यूज पोर्टल ने बांधले फटाके.
पोलीस वेरिफिकेशन च्या नावावर लोकांकडून पैसे घेवून भ्रष्टाचार करणारे भीमराव पडोळे जनतेसाठी देवदूत ठरले कसे ? खुद्द पोलीस प्रशासन संभ्रमात. भद्रावती प्रतिनिधी :- भद्रावती पोलिस स्टेशन मधे सद्ध्या भीमराव पडोळे म्हणजे सर्वकाही अशी परिस्थिती स्वतः भीमराव पडोळे यांनी न्यूज पोर्टल च्या प्रतिनिधीना पैसे देवून व त्यामधून स्वतःची वहावाही करून निर्माण केली आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक पवार यांना डावलून भीमराव पडोळे यांना मोठे दाखवण्याचा प्रकार नेमका कशासाठी आहे ? त्यामागचे रहस्य काय आहे ? हे समजायला मार्ग नसून गोपनीय विभागात कार्यरत असताना भीमराव पडोळे बाकीच्या अवैध दारू, अवैध रेती वाहतूक, सट्टापट्टी आणि वेळेवर येणाऱ्या तक्रारी संदर्भात जिथे तिथे नाक का खूपसतात ? याबद्दल स्वत ठाणेदार सुद्धा काही बोलायला तयार नाही याचे जणू भद्रावती शहरातील जनतेला आश्चर्य वाटत आहे. आता जवळपास दोन न्यूज पोर्टल वर
काँग्रेस असंघटित कामगार संघातर्फे वरोरा पोलिस स्टेशन चे परीवेक्षाधिन कर्तव्यदक्ष आय.पी.एस यतीश देशमुख यांचा सत्कार !
शाल व पुष्पगुच्छ देऊन छोटू भाई शेख यांनी केला सत्कार ! वरोरा प्रतिनिधी :- काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष तथा वरोरा नगरपरिषद सभापती बांधकाम यांनी पुढाकार घेवून आयपीएस अधिकारी यतीश देशमुख यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल भाऊ झोटिंग गोपालन. गुडदे..सर उपस्थित होते. आयपीएस अधिकारी यतीश देशमुख यांनी तीन महिन्यापासून वरोरा पोलीस स्टेशन येथे अतिशय सजग आणि कर्त्यव्य निष्ठेने कार्य करून येथील गोरगरीब पीडितांना न्याय देण्याचे कार्य केले असून चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा हे पहिले पोलिस स्टेशन आहे जिथे कोरोना च्या या लॉक डाऊन च्या काळात शहरातील व तालुक्यातील गोरगरीब यांना अनाज व अन्न वाटप उपक्रम सतत सुरू आहे. त्याचे श्रेय हे आय पी एस अधिकारी देशमुख यांना जात असून त्यांचा पुढाकाराने शासकीय कर्मचारी शिक्षक व व्यापारी यांनी पोलिस स्टेशन
खळबळजनक:- गडचांदूर पोलिस स्टेशन ठाणेदार भारती च्या भ्रष्ट लिला येताहेत समोर ?
पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड, मग ठाणेदार भारती च्या कारवाई चे काय ? कोरपणा प्रतिनिधी :- गडचांदूर पोलिस स्टेशन आता अवैध धंदेवाल्यांचे सरक्षण केंद्र बनले असून कुठल्याही गुन्हे प्रकरणात अंतिम शोध न करता त्या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण करून ते थंड बस्त्यात टाकण्याचे काम सद्ध्या जोरात सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे, महत्वाची बाब म्हणजे एखाद्या प्रकऱणा विषयी पत्रकारांनी स्टेशन डायरी संपर्क कक्षाला फोन केल्यास तेथील पोलिस कर्मचारी हे घटने संदर्भात माहीती देण्यास टाळाटाळ करीत असतात मात्र याबद्दल अधिक माहीती घेतली असता ठाणेदार भारती यांनीच पोलिस कर्मचाऱ्यांना मला विचारल्या शिवाय कुठलीही माहीती कुणाला द्यायची नाही असे आदेश दिले असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडित काही विशिष्ट लोकांना वाचविण्यासाठी ठाणेदार भारती यांचा पुढाकार