वनविभाग वडसा व वनपरिक्षेत्र कुरखेडा च्या जांभूरखेडा नियतक्षेत्रात लाखोंचा घोटाळा आला झाला उघड ? प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. कुरखेडा प्रतिनिधी :- एकीकडे ३३ कोटी झाडे लावण्याचा शासनाचा उपक्रम फसल्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात असताना वन विभाग मात्र या चर्चेला निरर्थक ठरवत आहे. परंतु जिल्हा विकास योजनेंतर्गत मागील सन २०१९ मधे वडसा वनविभाग व कुरखेडा वनपरिक्षेत्रात जवळपास २५ हेक्टर मधे अंदाजे २७५०० झाडे लावण्याचे लक्ष होते तिथे झाडेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मग खरोखरंच ३३ झाडे लावल्या गेली असेल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात मौका चौकशी केली असता त्या कुरखेडा वनपरिक्षेत्रात जवळपास २ हजार खड्डे खोदून असल्याचे दिसत आहे मात्र २७५०० पैकी एकही झाड तिथे बघावयास मिळत नाही तर मग ती झाडे गेली कुठे ? हा प्रश्न गंभीर