महिलेस विवस्त्र करून मारहाण करणे पोलिसांना भोवणार, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. राजुरा प्रतिनिधी :- पोलिस विभाग सद्ध्या भाजप शासन काळात एवढा मस्तावलेला आहे की अवैध धंदेवाईकांना सरक्षण आणि सर्वसामान्य जनतेसाठी कर्दनकाळ ठरत आहे. खरं तर महिलांचे सरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पोलिस विभागाचे आहे मात्र आता पोलिसच महिलांच्या इज्जतीवर हात टाकत असेल तर महिलांची अब्रू वाचेल कशी ? हा गंभीर प्रश्न आहे.नुकत्याच राजुरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हडस्ती गावातील एका महिलेस चोरी केल्याचा आरोप असल्याचे सांगून राजूरा पोलिसांनी नग्न करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी महिलेच्या गुप्तागांत मिरची पावडर टाकुन निर्दयपणे तीला मारहाण करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ज्या फिर्यादीने पिडीत महिले विरोधात तक्रार राजुरा पोलिस स्टेशनमधे दिली त्यावेळी तिची कसून चौकशी करून तिचेवर गुन्हे दाखल व्हायला