माणुसकीचा विजय : खरं तर आता माणुसकी शिल्लक राहिली नाही ही ओरड सर्वत्र बघावयास मिळते पण स्वार्थाने बरबटलेल्या या समाजात काही माणुसकी सुद्धा शिल्लक आहे याचे उदाहरण नुकतेच सातारा येथे बघावयास मिळाले आहे. धनाजी जगदाळे हे ग्रुहस्थ जे अत्यंत गरीब आहे ते सातारा बस स्टँड येथे आपल्या खेडेगावाला परत जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गावाला जाण्यासाठी १० रुपये तिकीट करिता हवे होते पण त्यांच्या जवळ केवळ 3 रुपयेच होते. मात्र त्यांच भाग्य खूब बलत्तर होतं कारण त्यांना बस स्टँडवर तब्बल ४० हजार रुपयाची थैली सापडली होती. कदचित दुसरे व्यक्ती असते तर ते पैसे स्वता जवळ ठेवले असते. पण माणुसकीचे दर्शन घडवून धनाजी जगदाळे यांनी पैशाची चणचण असतांना तब्बल ४० हजार हे मूळ मालकाला परत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला ती रक्कम सोपवली आणि त्यांना