महा मेट्रो आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड दरम्यान सामंजस्य करार नागपूर ०८ :* ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित महा मेट्रो नागपूर प्रकल्पात मेट्रो स्टेशनवर सोलर पॅनल लावण्यात आले आहे. नागपूर मेट्रो स्टेशन वर आता पर्यत ९६५ सोलर पॅनल लावण्यात आले आहे तसेच ६५% उर्जा ही सौर उर्जा प्रकल्पातून घेण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. आज पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोने आणखी एक पाऊल घेत उर्जा दक्षता सेवा लिमिटेड(Energy Efficiency Service Limited) या भारत सरकार,उर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला. महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्यूरमेट विभाग) श्री. आनंद कुमार आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख श्री. किशोर चव्हाण यांनी या सामंजस्य करारवर संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर,संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तांक्षर केले. महा मेट्रोचे
Tag: मेट्रो
दर तासाला मेट्रो सेवेचा शुभारंभ
नागपूर मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा महा मेट्रो तर्फे फुल व मिठाई वाटून प्रवासी नागरिकांचे स्वागत मेट्रो ट्रेनचे क्रॉसिंग दरम्यान टाळ्याचा कडकडाट नागपूर २८: महा मेट्रो नागपूरच्या दर तासाला मेट्रो प्रवासी सेवेचा तसेच अप लाईन मार्गिकेवर च्या मेट्रो सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. सकाळी ८.०० वाजता पासून पहिली फेरी सिताबर्डी येथून खापरी स्टेशनच्या दिशेने रवाना झाली तसेच त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशन येथून ही मेट्रो ट्रेन सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन करता निघाली. महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना फुल व मिठाई वाटून प्रवाश्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना मेट्रो सेवा व महा कार्ड संदर्भात माहिती प्रदान करण्यात आली. याशिवाय मेट्रो स्टेशन येथे कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याला देखील मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. सिताबर्डी व खापरी येथून एकाच वेळी निघालेल्या दोन्ही मेट्रो ट्रेन छत्रपती चौक येथे