महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणी नागपूर दि. 13 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियेजनामुळे राज्यात 2018-19 या वर्षात 17 लक्ष 90 हजार कुटुंबातील सुमारे 32 लाख 71 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात 846 लक्ष मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षात सर्वाधिक मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य राज्यात पूर्ण केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावातच शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असून रोजगाराची हमी राज्य शासनाने दिली आहे. संपूर्ण राज्यामध्ये या योजनेतून अंमलबजावणी सुरु असून ग्रामीण भागात स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करण्यासोबतच रोजगारासाठी स्थलांतराची वेळ नागरिकांवर येवू नये. हा मुख्य उद्देश या योजनेचा अंमलबजावणीचा आहे. राज्यामध्ये या योजनेच्या सन 2018-19