शवविच्छेदनानंतर केले दहन ! चंद्रपूर प्रतिनिधी :- भद्रावती तालुक्यातील चारगाव येथील नदीच्या पात्रात पडलेला वाघ 7 नोव्हेंबर 2019 रोजी मृत झाल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार वाघाचा मृत्यू अंतर्गत रक्तस्रावामुळे व पाण्यात बुडाल्याने झालेला असून वाघाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले, अशी माहिती विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे यांनी दिली. सदर वाघ चारगाव गावाजवळील डब्लुसिएल क्षेत्रातील नदीच्या पात्रात पडलेला आहे, अशी माहिती 6 नोव्हेंबर 2019 रोजी वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनविभागाचा चमू घटनास्थळी पोहोचला. परिस्थितीची पाहणी करून वाघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाघाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी, बुलडोजर या यंत्रांचा वापर करण्यात आला. परंतु प्रयत्न विफल झाल्यानंतर वाघाला बेशुद्ध न करता पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी हायड्रोलिक क्रेनच्या साह्याने पिंजरा वाघाजवळ पाण्यामध्ये सोडण्यात आला. परंतु वाघ पिंजऱ्यामध्ये न येता पाण्यामध्ये पुढे गेला. वाघाला बाहेर येता यावे याकरिता