रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश आणि केली तोडफोड, डॉक्टरांनी मानली हार पोलिसात नाही तक्रार ! चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर शहरातील प्रख्यात व नामवंत डॉ.कुबेर यांचे रुग्णायलात आज सकाळी उपचारादरम्यान एका तरुण रुग्णाचा मृत्यू झाला हा म्रुत्यु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर्सवर आरोप लावले व रुग्णालय गाठून तेथील अतिदक्षता विभागाच्या मुख्य दाराचे काचे फोडून संताप व्यक्त केला. दिनांक २६मार्चला राकेश यादव नावाचा ३६वर्षिय युवक प्रक्रुती बरी नाही म्हणून उपचारार्थ दाखल झाला.त्याची तब्येत अधिक खराब झाल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांस तात्काळ भरती होण्यांचा सल्ला दिला नंतर लगेच त्यास अतिदक्षता विभागात ठेवून त्याचेवर उपचार केले पण उपचार योग्य पद्धतीने न झाल्याने तब्बल ५ दिवस उलटून सुद्धा बिमारिचे योग्य निदान डॉक्टर्स काढू शकले नसल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी म्रुत्यु झाला, मूत्यूची बातमी बाहेर पडताच काही
Tag: वैद्यकीय
धक्कादायक :-चीनमधे कोरोनाचा धोका आहे हे सांगणाऱ्या डॉ. ली यांचेच कोरोना आजाराने निधन !
चिन सरकारने मागितली डॉ.ली यांच्या परिवाराची माफी ! कोरोना वार्ता :- चिन मधे कोरोना व्हायरससंबंधी सर्वप्रथम माहिती देणाऱ्या डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे. ली यांनी जगाला करोनाचा धोका असल्याचे सार्वजनिक केल्याने चीन सरकारने त्यांच्यावर कायेदशीर कारवाई केली होती. नंतर करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे चीनने सांगितले होते. पण आता चीनने ली यांनी करोना संदर्भात दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे मान्य करत त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे. डॉक्टर ली हे वुहान शहरातील सरकारी रुग्णालयात काम करत होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सात जण विचित्र तापाने फणफणल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांच्या आजाराची लक्षण पाहता ती फ्लू किंवा सार्सची नसल्याचे पण सार्सच्या वर्गवारीतील करोना व्हायरसची असल्याचे ली यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आपली ही शंका डॉक्टरांच्या
ब्रेकिंग न्यूज :- इराणमधून वरोऱ्यात परतलेली ‘ती’ व्यक्ती कोरोना पिडीत नाही,
कोरोना अपडेट स्पेशल :- वैद्यकीय अहवालानंतर झाले शीद्ध, अफवांच्या बाजाराने जनतेत मात्र दहशत! वरोरा प्रतिनिधी :- ईराणवरून वरोऱ्यात परतलेली ती व्यक्ती कोरोना पिडीत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे संपूर्ण राज्यात पसरली व चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना ह्या व्हायरस आजाराचा रुग्ण असल्याच्या माहितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनता भयभीत झाली होती व वरोरा येथील तो रुग्ण कोण ? याबद्दल सर्वांना त्याबद्दल माहिती घेण्याची प्रबळ इच्छा होती मात्र ईराणवरून आलेला तो व्यक्ती कोरोना पिडीत नसल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केल्यामुळे जनतेने आता सुटकेचा श्वास घेतला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीनंतर चीनसह जगात विविध ठिकाणी तीन हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा जीवघेणा व्हायरस भारतात पसरला असल्याने तो वाढू नये म्हणून शासनातर्फे कोरोना बाधित देशातून भारतात येणाऱ्या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच अशा संशयितांवर आरोग्य विभाग काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे,