अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी दिला विधानसभेसाठी अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभा निवडणुकीत मिळणार आपची साथ नागपूर /प्रतिनिधी आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि समाजाच्या विविध घटकातील पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी आगामीी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राहणार असून त्यांनी मागील दीड महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे दरम्यान श्रमिक एल्गार या समाजसेवी संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला. ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रमिक एल्गार मागील वर्षभरापासून रणनीती आखत आहे. मागील महिन्यात ऑगस्ट क्रांती संपर्क अभियान राबवून गावागावात लोकांशी संपर्क साधून प्रचाराचा नारल फोङला. आता आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना एङ. पारोमिता गोस्वामी यांनी प्रचारसभा, गावभेटी, लोकसंवादावर भर दिला आहे. सध्या या मतदारसंघात राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रतिनिधित्व करीत आहेत. एडवोकेट पारोमिता गोस्वामी
Quotes
निवडणूक विभागाच्या निर्मितीसह नवीन 128 पदांना मंजुरी
महाराष्ट्रासाठी असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाऐवजी राज्य निवडणूक विभाग म्हणून स्वतंत्र विभाग निर्माण करण्यास आणि त्यासाठी नवीन 128 पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने 4 मार्च 2014 च्या पत्रान्वये, निवडणुकांच्या काळात व निवडणुका नसतानाच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालय आणि त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा व तालुका स्तरावरील क्षेत्रीय कार्यालये यांच्यासाठी आकृतीबंध निश्चित केला आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयाची संरचना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीचे कामकाज हे अत्यंत संवेदनशील, महत्वाचे तसेच कालमर्यादेत असल्याने, भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नवीन पदांची निर्मिती करण्याचेदेखील निर्देश दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या या सूचनांनुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील कार्यासन 33 (निवडणूक शाखा) अंतर्गत कार्यान्वित असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी, कार्यालयाऐवजी राज्य निवडणूक विभाग निर्माण करण्याचा